जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : भाजपमध्ये होणार मोठे बदल, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार, मंत्रिमंडळात लागली वर्णी?

BREAKING : भाजपमध्ये होणार मोठे बदल, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार, मंत्रिमंडळात लागली वर्णी?

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई, 06 जुलै :  शिंदे-फडणवीस सरकार (shinde government) स्थापन झाल्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे बदल केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची मंत्रिमंडळात जागा फिक्स झाली आहे. त्यामुळे लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच खातेवाटप केले जाणार आहे.  तर दुसरीकडे, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची फेब्रुवारीपर्यंत टर्म आहे. त्यातचं चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. (दे वेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाही? अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया ) दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता खातेवाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महसूल मंत्रिपदावरून भाजपमध्ये खलबत सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल खाते हवे आहे. पण महसूल खाते कुणाला द्यावे यावरून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. याआधीही महसूल खाते हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होते. याहीही वेळी चंद्रकांत पाटील हे महसूल खात्यासाठी तयारी करत आहे. शिंदे गटातही खात्यासाठी रस्सीखेच तर, शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या 40 हून अधिक आमदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना फोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. आतापर्यंत बच्चू कडू यांच्याजवळ राज्यमंत्रिपद होतं. मात्र आता कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि मोठा विभागा असावा अशी मागणी केल्याची चर्चा आहे. जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास यांसारखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात