Home /News /mumbai /

कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील 'एक व्यक्ती एक पद' या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

    मुंबई, 6 जुलै : राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपामध्ये (BJP) संघटनात्मक बदलांच्या हलचालींना वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील 'एक व्यक्ती एक पद' या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून 3 नेत्यांची नावं चर्चेत आहेत. सत्ताबदलानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य हे मुंबई महापालिका जिंकणे हे आहे. राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार (Ashish Shelar) हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.  शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजपा नेते आहेत. ते यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे (Ram Shinde) यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील  शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे देखील नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.'पक्षानं मला आजवर भरभरून दिलं आहे. यापुढेही पक्षाचा जो आदेश असेल तो स्विकारेन' असं बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना जाहीर केले आहे. 'शिंदेंना भेटायला हे वेशांतर करून जात होते', अमृता फडणवीसांनी सांगितला घरातला किस्सा खातेवाटपावरून रस्सीखेच दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता खातेवाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महसूल मंत्रिपदावरून भाजपमध्ये खलबत सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल खाते हवे आहे. पण महसूल खाते कुणाला द्यावे यावरून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. याआधीही महसूल खाते हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होते. याहीही वेळी चंद्रकांत पाटील हे महसूल खात्यासाठी तयारी करत आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ashish shelar, BJP, Chandrakant patil, Maharashtra politics

    पुढील बातम्या