Home /News /maharashtra /

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध

ठाणे जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

ठाणे, 15 जुलै: ठाणे जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. अध्यक्ष- उपाध्यक्षाची निवडणुकही बिनविरोध झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्षपदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हेही वाचा... भीषण अपघात! एसटी बसची मोटारसायकल धडक, मायलेकानं जागीच सोडला जीव शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा... ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाआघाडी गठीत करण्यात आली. यासाठी ठाणे येथील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत सकाळी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत करण्यात आली. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या. ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी 15 जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाले. दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. हेही वाचा...10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी,या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Thane, Thane news

पुढील बातम्या