भीषण अपघात! एसटी बसची मोटारसायकल धडक, मायलेकानं जागीच सोडला जीव

भीषण अपघात! एसटी बसची मोटारसायकल धडक, मायलेकानं जागीच सोडला जीव

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील वळणे औद्योगिक वसाहतीजवळ (MIDC)एसटी बस आणि दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदा धडक झाली.

  • Share this:

शिवाजी गोरे (प्रतिनिधी),

रत्नागिरी-दापोली, 15 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील वळणे औद्योगिक वसाहतीजवळ (MIDC)एसटी बस आणि दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदा धडक झाली. या भीषण अपघातात मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.

मीनाक्षी मंगेश बोरजे (वय-45), आकाश मंगेश बोरजे (वय-21) या मायलेकाचा मृत्यू झाला तर विलास गोरीवले, निलेश गोरीवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा...आधी मुलगी आता तरुण मुलानं केली आत्महत्या, दु:ख अनावर झाल्यानं आईनेही...

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दापोली परिसरातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर हा अपघात घडला. या अपघातात आई व मुलगा जागीच मृत्यूमुखी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, भरधाव ट्रकनं एका पुरोहीताला चिरडलं असून त्याचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा- मनोर मार्गावरील पालीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अजय कापसे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पालघरमधील वाडा-मनोर मार्गावरील पाली गावाजवळ दुचाकीवर वाड्याच्या दिशेने चाललेल्या अजय कापसे यांनी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. अपघातात पुरोहित कापसे यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा.. 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी,या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज

वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमधील मंदिरात पूजेसाठी गेलेले कापसे वाड्याच्या दिशेने परतत होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 15, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या