Home /News /pune /

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालानंतर या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज!

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालानंतर या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षाचे लवकरच ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

पुणे, 15 जुलै :  CBSE परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 10 वी आणि 12 वी परीक्षांचा निकाल नजीकच्या काळात लागणार आहे. त्यानंतर गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षाचे लवकरच ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित प्रत देणे आणि पुनर्मुल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी मंडळामार्फत ऑललाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बापानेच केला अतिप्रसंग, संतापलेल्या मुलीने गळ्यावर पाय देऊन घेतला जीव त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही. कोरोनाची परिस्थिती पाहता आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना  गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र लागणार आहे. त्यांच्यासाठी दोन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://verification.mh-ssc.ac.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय, नेट बँकिंगनेही भरता येणार आहे. कोरोनावर प्रभावी 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, महाराष्ट्राला फायदा दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी 10वी-12वीचे निकाल हे 15 ते 20 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाइटवरही हा निकाल पाहता येणार आहे. या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या