मुंबई, 12 मार्च : मध्य प्रदेशात (MP) सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मित्रपक्षांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (Shivsena) मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या (Saamana) संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. त्यात लिहिले आहे की, ‘मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. कमलनाथ सरकार कोसळताना दिसत आहे. त्यांचा निष्काळजीपणा, अहंकार आणि नवीन पिढीला कमी लेखण्याची वृत्ती ही त्यामागची कारणं आहेत. संबंधित - अखेर ‘कमल’नाथ सोडून कमळ घेतलं हाती, ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजप प्रवेश शिवसेनेच्या मुखपत्रात असेही लिहिले गेले आहे की ‘दैव देतं आणि कर्म नेतं’, अशीच परिस्थिती काँग्रेस पक्षाचीही झाली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सुमारे 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासह कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले आहे. कमलनाथ सरकार कोसळताना दिसत आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा, अहंकार आणि नवीन पिढीला कमी लेखण्याची प्रवृत्ती आहे. संबंधित - दिल्लीतील लग्नात ठरलं! ज्य़ोतिरादित्य शिंदेंची काँग्रेस सोडण्याची इन्साईट स्टोरी शिंदेंशिवाय मध्य प्रदेशातील राजकारण करता येणार नाही महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेली शिवसेना म्हणाली की, ज्योतिरादित्य शिंदेंकडे दुर्लक्ष करून मध्य प्रदेशात राजकारण करता येणार नाही. ‘सामना’च्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, ‘शिंदेंचा प्रभाव संपूर्ण राज्यावर कदाचित नसेल, परंतु ग्वाल्हेर आणि गुनासारख्या मोठ्या भागात ‘शिंदेशाही’चा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते, परंतु नंतर वरिष्ठांनी त्यांना डावललं आणि दिल्ली हाय कमांड फक्त पाहत राहिलं. त्यावेळी मध्य प्रदेशातील परिस्थिती गोंधळाची होती, लोकसभा निवडणुका गमावलेल्या शिंदेंना ‘रद्दी’ मध्ये टाकणे काँग्रेसला सोपे नव्हते. या असंतोषामुळे वेळोवेळी ठिणग्या फुटत होत्या.’ संबंधित - ज्योतिरादित्यांचा थाटमाट! डोळे दिपवणारं वैभव, उद्योगपतींपेक्षा जास्त संपत्ती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.