Home /News /national /

दिल्लीतील या लग्नात ठरलं! ज्य़ोतिरादित्य शिंदेंची काँग्रेस सोडण्याची इन्साईट स्टोरी

दिल्लीतील या लग्नात ठरलं! ज्य़ोतिरादित्य शिंदेंची काँग्रेस सोडण्याची इन्साईट स्टोरी

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    नवी दिल्ली, 11 मार्च : काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्य़ोतिरादित्य शिंदेनी (Jyotiraditya Scindia) आपला पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील (MP) कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्य़ोतिरादित्य शिंदे विविध कारणांमुळे पार्टीच्या प्रमुखांपासून नाराज होते. मात्र राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या एका लग्नादरम्यान जे काही झालं त्यामुळे भविष्यातील दशा आणि दिशा ठरवली. हे लग्न होतं भाजप राष्ट्रीय़ अध्यक्ष जेपी नड्डा यांचे पूत्र गिरीश नड्डा यांचं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह मध्य प्रदेशातील नेत्यांनीही मेजवानीमध्ये भाग घेतला होता. संबंधित - ज्योतिरादित्यंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान एका माध्यमांच्या वृत्तानुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या रिसेप्शनमध्ये भाग घेतला होता. असे म्हटले जाते की, त्यावेळी शिवराज सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदेंबद्दल आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते. अहवालानुसार, यानंतरच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी संपूर्ण प्रकरणावर विचार केला आणि तीन दिवसानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशास सहमती दर्शविली. काय झालं होतं त्य़ा रिसेप्शनमध्ये.. जेपी नड्डा यांचे पूत्र गिरीश नड्डा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे काही फोटो समोर आले आहे. अमित शहा, शिवराजसिंह चौहान आणि अन्य भाजप नेते यामध्य़े दिसत आहेत. असे म्हटले जाते की, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत भाजप (BJP) नेत्यांनी गंभीरपणे चर्चा केली. यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक आमदार कसे भाजपला पाठिंबा देऊ शकतात आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येऊ शकते हे सांगितले होते. होळीच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. यापूर्वी त्यांनी दिल्लीत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. संबंधित - शिंदे घराण्याचं काँग्रेसशी नातं : संजय गांधींच्या प्लेन क्रॅशशी असा होता संबंध
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Congress, Delhi, Jyotiraditya scindia

    पुढील बातम्या