मराठी बातम्या /बातम्या /देश /

अखेर ‘कमल’नाथ सोडून कमळ घेतलं हाती, ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजप प्रवेश

अखेर ‘कमल’नाथ सोडून कमळ घेतलं हाती, ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजप प्रवेश

काल धुलिवंदनाच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता

काल धुलिवंदनाच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता

काल धुलिवंदनाच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 11 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे ( jyotiraditya scindia) यांनी काल धुलिवंदनाच्या दिवशी काँग्रेसमधून (Congress) राजीनामा दिला. आज त्यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपत (BJP) प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर पुढील राजकारण वेगळं वळण घेताना पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी जोतिरादित्य शिंदे काल भाजप प्रवेश करणार होते. त्यानंतर आज दुपारी 12.30 वाजता भाजप प्रवेश करणार होते. मात्र त्यांच्या काही कारणाने त्यांच्या भाजप प्रवेशाला उशीर झाला. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स होता. मात्र आज अखेर ज्योतिरादित्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. शिंदे 13 मार्चला भाजपकडून राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित - ज्योतिरादित्यंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान

अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले विश्वासून सहकारी सज्जनसिंह वर्मा यांच्यावर नाराज आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. कमलनाथ यांच्यावर नाराज असलेले आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आमदार बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये राहात होते. या सगळ्या नाराजांची समजूत काढण्यासाठी (Sajjan Singh Verma) स्वत: बंगळुरू (Bengaluru) ला जाऊ शकतात. काल संध्याकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होती, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती.

संबंधित - दिल्लीतील लग्नात ठरलं! ज्य़ोतिरादित्य शिंदेंची काँग्रेस सोडण्याची इन्साईट स्टोरी

First published:

Tags: BJP, Congress, Delhi, Jyotiraditya scindia