मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shivsena Vs Shinde : शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज 'सर्वोच्च' सुनावणी

Shivsena Vs Shinde : शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज 'सर्वोच्च' सुनावणी

 आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 10 जानेवारी : शिवसेना कुणाची? या एका प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्य आता निर्णयाक टप्प्यावर पोहोचले आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती.

(संजय राऊत यांचा जामीन कायम की पुन्हा जेलवारी? 'या' तारखेला होणार हायकोर्टात सुनावणी)

त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.

'ती देशाची मालमत्ता..' ओबीसी जनगणनेवरुन छगन भुजबळ आक्रमक; केली मोठी मागणी)

एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार असताना, शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हं कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केली आहेत.

आतापर्यंत कुणी किती कागदपत्रं सादर केली?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य

प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)

प्राथमिक सदस्य 20 लाख​

एकूण कागदपत्र - 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना

खासदार - 13

आमदार - 40

संघटनात्मक प्रतिनिधी - 711

स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी - 2 हजार 46

प्राथमिक सदस्य - 4 लाख 48 हजार 318

शिवसेना राज्यप्रमुख - 11

एकूण कागदपत्र - 4 लाख 51 हजार 139

First published:

Tags: Maharashtra politics, Marathi news, Supreme court