मुंबई, 9 जानेवारी : ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत आहेत. आज ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस आली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात संजय राऊत हे तब्बल 100 दिवस तुरुंगात होते. संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला इडीकडून विरोध होत आहे. राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राऊतांचा जामीन कायम राहणार की पुन्हा जेलवारी होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. वाचा - ‘ती देशाची मालमत्ता..’ ओबीसी जनगणनेवरुन छगन भुजबळ आक्रमक; केली मोठी मागणी या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.
शिंदे गटाचे तिसरे आमदार एसीबीच्या रडारवर राजन साळवी, वैभव नाईक व आता उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवार आले आहेत. त्यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये देशमुख यांना 17 जानेवारी रोजी अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी एसीबीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.