जळगाव 21 नोव्हेंबर : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. 50 रेडे गुवाहाटीला परत चाललेत, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांमुळे हे सगळे आमदार शिंदे गटात गेला असल्याचा दावा, पाटील यांनी केला आहे. ‘या राज्यपालांना कुठंही नेऊन घाला’, शिंदे गटाच्या आमदाराची थेट मागणी संजय राऊत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीत असं वक्तव्य करतात. शिंदे गटाविषयी बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे ते वाटेल तसं बडबडतात. संजय राऊत यांच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्यामुळे 50 आमदार शिंदे गटात गेले. आमदार शिंदे गटात जाण्याचं मुख्य कारण राऊतच आहेत, असा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आधी रोज एक एक माणूस आपल्यातून निघून जातोय त्याकडे बघा. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे ते काहीही बोलतात. राऊत जेलमध्ये होते. अशात त्या माणसाविषयी काही न बोललेलंच बरं. ते गुन्हेगार आहेत, असा टोला त्यांनी लगावला. इतिहासामुळे वादात सापडलेल्या भगतसिंग कोश्यारींचा इतिहास, अशी झाली राजकारणात एण्ट्री! राज्यपालांवर भडकले शिंदे गटाचे आमदार - दरम्यान सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या मुद्द्यावरुन शिंदे गटाच्या आमदारानेही राज्यपालांना सुनावलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. यावरुन शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांवर टीका केली आहे. या राज्यपालाला कुठंही नेऊन घाला, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. तसेच भगतसिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून काढा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यानंतर, असं वक्तव्य खपवून घेणार नाही. अन्यथा याचे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.