सातारा, 3 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर शरद पवारांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये पुढची भूमिका मांडली. आता आपण राज्यवापी दौरा करणार असून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘अजित पवार परके नाहीत, अजित पवार म्हणजे पक्ष नाही. अजित पवारांना भेटण्यात गैर नाही. काल माझी मुलगी सुप्रिया सुळे तीनवेळा तिकडे गेली होती, याचा अर्थ तिने चुकीचं काम केलं असं नाही. आम्ही सोबत काम केलं आहे, मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचं काम एखाद्या सहकाऱ्याने केलं असेल तर मी त्यावर संशय घेणार नाही,’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी पत्रकारांनाही खडसावलं. अजित पवारांच्या या पावलाला बंड म्हणायचं का आशीर्वाद? असा प्रश्न विचारला असता पवार संतापले. ‘आम्ही कुणाच्या अपात्रतेच्या कारवाईमध्ये जाणार नाही. माफ करा पण तुमच्यासारखा क्षुद्र बुद्धीचा व्यक्ती असेल तोच आशीर्वाद देईल, एवढं समजत नाही. मी जाहीरपणाने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी, त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये आशीर्वाद शब्द वापरून एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका,’ असं शरद पवारांनी खडसावलं. ठरलं! शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा; पहिली सभा या मंत्र्यांच्या मतदारसंघात अजित पवारांना भेटण्यासाठी वेळ देणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा हा जर तरचा विषय आहे. त्यांनी वेळ मागितली तर विचार करू, तुमच्याकडे काही मेसेज आला आहे का? तुमच्याकडे पत्र आहे का? असा तिरकस सवाल शरद पवारांनी पत्रकारांना विचारला. जयंत पाटील यांनी अपात्रतेच्या कारवाईचं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे, असं शरद पवारांना विचारण्यात आलं तेव्हा आपल्याला याबाबत कल्पना नसल्याचं शरद पवार म्हणाले. जयंत पाटील विधिमंडळात नेते आहेत, नेत्याने निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. तुमच्याकडून मला कळत आहे, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर काही विचार करूनच घेतला असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. कुणाला अपात्र करायचं की नाही, याबद्दल जयंत पाटील निर्णय घेतील, मी त्याबद्दल बोलणार नाही. माझ्या काही सहकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे, पण मी मनामध्ये राग धरून कधी कारवाई करत नाही, असंही शरद पवार म्हणाले. अजित पवारांसोबत गेलेले किती आमदार संपर्कात? आव्हाडांनी आकडाच सांगितला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.