सातारा, 3 जूलै : अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजून आपण मैदानात असल्याचे संकेत दिले. पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे कराडमध्ये कार्यक्रमासाठी आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची आहेत. या दौऱ्याची सुरुवात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मतदारसंघातून करण्यात येणार आहे. शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, हा पक्षाच्या धोरणाचा निर्णय नाही, ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक आहेत, ते बसतील आणि निर्णय घेतली. त्यामुळे बाकीचे नेते आहेत. जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय घेतील. मी पक्षप्रमुख म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक केली आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पक्षासाठी जी पावलं टाकली पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यामुळे ज्यांनी जबाबदारी टाकली त्यांचा आता विश्वास राहिला नाही. त्यासाठी उचित कारवाई करावी, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागले. पक्षाच्या चौकटीबाहेर गेले, चौकट घेऊन गेले, त्या प्रत्येकांचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा आणि प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागणार आहे. दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार असून दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवनेरीपासून करणार असून शेवट रायगडवर करणार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाचा - आता खरी लढाई सुरू? राष्ट्रवादीचे दोन्ही गट विधीमंडळाकडे; खरा पक्ष कोणाचा? अध्यक्षांसमोर आव्हान शरद पवारांनी पत्रकाराला खडसावलं पत्रकार - याला बंड म्हणायचं का आशीर्वाद? पवार - आम्ही कुणाच्यावर अपात्रेच्या कारवाईमध्ये जाणार नाही. या सगळ्या रस्त्यात आम्ही कुठे जाणार नाही. तुमच्या सारखा माफ करा पण क्षुद्र बुद्धीच्या व्यक्ती असेल तोच आशीर्वाद देईल, त्याला एवढंच समजत नाही. मी जाहीरपणाने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय, पक्षाच्या बांधणीसाठी. त्यावेळेला पत्रकार परिषदेत आशीर्वाद शब्द वापरून एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका, ही माझी विनंती आहे, अशा शब्दात पवारांनी पत्रकाराला खडसावलं आहे. काय म्हणाले पवार? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्याला नेतृत्व दिलं, त्यांचं नाव आहे जयंत पाटील आहे, ते विधिमंडळात नेते सुद्धा आहे. नेत्याने एखाद्यावेळी निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. तुमच्याकडून मला कळलं आहे. तो निर्णय जर त्यांनी घेतला असेल तर काही विचार करूनच घेतला असेल. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे. आणीबाणी जेव्हा देशात लागू झाली होती, अनेक राजकीय पक्ष आणि मीडियाने इंदिरा गांधी यांच्यावर अत्याचार केला होता. इंदिरा गांधी यांनी योग्य काम केलं हे सांगणारे फक्त बाळासाहेब ठाकरे होते आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली शिवसेना एकच असा पक्ष होता त्याने एकही उमेदवार दिला नव्हता, इंदिरा काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज काही घडतंय, आम्ही काही वेगळं करतो असं नाही. काल ज्यांनी शपथ घेतली त्यावेळी शिवसेना सोबत असताना शपथ घेतली होती. त्यामुळे शिवसेनेसोबत गेला हे काही कारण नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.