Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात? जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात? जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 26 जानेवारी :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना बोलत होते. दरम्यान जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत  

23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र हा पाहाटेचा शपथविधी देशभरात चर्चेचा विषय ठरला होता, आता पुन्हा एकदा जंयत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते. राष्ट्रपती राजवट उठवणे आवश्यक होते, त्यामुळे पवरांची ती खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पहाटेच्या थपथविधीमागे शरद पवारांचा हात होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रकाश आंबेडकरांचा निशाणा  

दरम्यान दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे भाजपचे आहेत. माझं पवारांबाबत आधिपासूनच मत आहे. तुम्ही डोळे झाकून चालला आहात. माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, Jayant patil, NCP, Sharad Pawar