सोलापूर 01 ऑक्टोबर : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. आता परत एकदा त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. शरद पवारांनी एकदा महाराष्ट्राचा दौरा केली की राष्ट्रवादी सत्तेत येते, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता. मात्र, शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे, असा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे. MNS Raju Patil : मनसे आमदार राजू पाटलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा, म्हणाले पुढचा खासदार यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी चिमटे काढले आहेत. अजित पवार यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं भाषण सोबतच सुरू झाल्यास आधी ठाकरेंचं भाषण ऐकणार. यावरुन अजित पवारांना टोला लगावत शहाजीबापू म्हणाले, की ‘अजित दादा आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार आहेत. दादाला आता भाषण ऐकण्याशिवय काय काम उरलं नाही. इंदुरीकर महाराज यांची कीर्तनं त्यांनी ऐकावी.’ Gulabrao Patil : थापा आला, आता आणखी एक ‘खास माणूस’ येतोय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना धक्का यासोबतच दसरा मेळाव्यावरुनही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवतीर्थावर जाणारे पवारांच्या विचाराचे, तर बीकेसीवर जाणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असतील, असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरदार होणार आहे. जे शिवतीर्थावर जातील ते शरद पवार यांच्या विचाराचे तर बीकेसीवर जमणारे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. शहाजीबापू पुढे म्हणाले, की शरद पवार यांचे 50 च्या वर आमदार येत नाहीत. राज्यात आणि देशात फिरले तरी 50 आमदारांच्या वर ते जात नाहीत. एवढ्यातच त्यांचा सगळा खेळ सुरू आहे, असा टोला पवारांना लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.