मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gulabrao Patil : थापा आला, आता आणखी एक 'खास माणूस' येतोय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना धक्का

Gulabrao Patil : थापा आला, आता आणखी एक 'खास माणूस' येतोय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना धक्का

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात सामील होणार असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 1 ऑक्टोंबर : शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली. यानंतर शिवसेनेतील काही नेते अद्यापही शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात सामील होणार असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पाटील हे धुळ्यातील सभेत बोलत होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले कि, मी 50 खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे हे मला मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तो देखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार, व्यापाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मागच्या दोन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यावेळी सर्वात पहिल्यांदा चर्चेसाठी मिलिंद नार्वेकर गेले होते. यानंतर एकनाथ शिंदे गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते.

थापा का गेले शिंदे गटात शिवसेनेकडून खुलासा

बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासोबत सावली सारखा मागे उभा राहणाऱ्या चंपासिंग थापा याने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंग थापा याने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

हे ही वाचा : अजितदादा म्हणाले, 'प्रशिक्षणाला येतो', फडणवीसांनी दिले खुमासदार उत्तर, म्हणाले...

चंपासिंग थापासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्या सोबत आलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

कोण आहेत चंपासिंग थापा?

चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरूवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला.

First published:

Tags: Cm eknath shinde, Gulabrao patil, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)