मुंबई, 01 ऑक्टोंबर : कल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही, असा सूचक इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच त्यांनी घराणेशाहीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे गटात घराणेशाही नवीन नसल्याचे राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीला पायउतार करून सत्तेत आलेल्या भाजपला आणि शिंदे गटाला पांठींबा दिलल्या मनसेने आता शिंदेगटावर निशाणा साधला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिंदे गटामध्ये पोस्टर वॉर रंगलं होत. रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून मनसेकडून पोस्टर लावत शिंदे गटाच्या कामावर बोट ठेवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून देखील मनसेच्या पोस्टरला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
हे ही वाचा : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार, व्यापाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मी आमदारकीला उभं राहणार नव्हतो. मात्र, राज ठाकरेंनी म्हटल्यामुळेच मी उभं राहिलो. जर त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर ती निवडणूकही लढवेन. पण एक गोष्ट निश्चित आहे, की यापुढे कल्याणचा खासदार जो कोणी खासदार होईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मनसेची मदत घ्यावीच लागेल. मनसेच्या मदतीशिवाय कल्याणमध्ये कोणीही खासदार होऊ शकणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंच्या भेटीचा भाजप खासदाराला आवरला नाही मोह, विमानतळावर जाऊन घेतली भेट
शिदे गटात घराणेशाही नवीन नाही. हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आहे. मात्र, प्रत्येक पक्षाने हे लक्षात ठेवायला हवं, की केवळ घरातले नाही, तर कार्यकर्त्यांनाही संधी द्यायला पाहिजे. दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे गटातील वादावर ते म्हणाले कि, दोन्ही गटात असंतोष स्पष्ट दिसून येत आहे. हे मराहाराष्ट्राच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने बरोबर नसल्याचे ते म्हणाले.