मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shambhuraj Desai : साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली, शंभूराजेंची रामराजेंवर खरमरीत टीका

Shambhuraj Desai : साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली, शंभूराजेंची रामराजेंवर खरमरीत टीका

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून  राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे.

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे.

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

मुंबई, 25 ऑक्टोबर : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून  राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातही शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला होता. यावर राज्याचे उत्पादन शुल्क  मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजुनही 15 वर्षे सत्तेत येऊ शकत नसल्याचा दावा केला आहे. ते काल माध्यमांशी बोलत होते.

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांचा समाचार घेत म्हणाले की, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही. जर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, असे रामराजे म्हणतात.

हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचा तो निर्णय, अजितदादांकडून कौतुक पण शरद पवारांची टीका

तर मला पण राजे साहेबांना सांगायचं आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.

याशिवाय राम राजे नाईक-निंबाळकर यांनी स्वतः पुरते पाहू नये, आजही सत्तेत येण्यासाठी बहुमताला महत्व आहे. त्यांना खंत याची आहे की त्यांचा पक्ष सत्तेत नाही, सत्तेत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात किंवा टिकणार नाही असे म्हणून चालत नाही.

हे ही वाचा : पुरंदर विमानतळावरून आरोपांचं 'लँडिंग', जागेवरून पवारांची राज्य सरकारवर तोफ

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे, याशिवाय पुढील अडीच वर्षे काय पुढील दहा ते पंधरा वर्षे ते तळमत राहील, अशा खरमरीत शब्दात शंभूराजे देसाई यांनी टीका केली.

अजित पवारांकडून राज्य सरकारचे कौतुक

भूविकास बँकेच्या संपूर्ण कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे, पण काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं. मुख्य म्हणजे अजित पवार अर्थमंत्री असताना 2022-23 च्या अर्थसंकल्पात भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

First published:

Tags: NCP, Ramraje nimbalkar, Satara, Satara (City/Town/Village), Satara news