जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ज्योतिर्लिंग आसामला गुवाहाटीच्या बदल्यात दिलं का'? राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं

'ज्योतिर्लिंग आसामला गुवाहाटीच्या बदल्यात दिलं का'? राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं

संजय राऊतांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

संजय राऊतांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावरून केंद्र सरकारला देखील टोला लगावला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी :  संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाममध्ये असल्याचा दावा केला होता. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत  यांनी यावरून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. ज्योतिर्लिंग आसामला गुवाहाटीच्या बदल्यात दिलं का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अमित शाहांवर निशाणा   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्रिपुरात जाऊन अमित शाहांनी रेवड्या उडवल्या आहेत, पाहुयात तिथली जनता काय निर्णय घेते? तिथली जनता सुज्ञ आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  गिरीश बापट पक्षावर नाराज आहेत का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं दरम्यान औरंगाबादच्या नामंतरनावरून देखील संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा दिल्लीच्या मोठ्या लोकांनी डरकाळ्या फोडल्या, मग आता नाव का बदलत नाहीये,  मंजुरीला कोणता नियम कोणता कायदा आडवा येतोय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात