मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बेईमान व्यक्तींची शिवरायांशी तुलना हा तर महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊत लोढांवर भडकले

बेईमान व्यक्तींची शिवरायांशी तुलना हा तर महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊत लोढांवर भडकले

संजय राऊत

संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे,फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई , 1 डिसेंबर :  ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांचा हा पहिलाच दौरा आहे. नाशिक दौऱ्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनता आमची वाट पहातेय, नाशिकपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बंडीखोरीनंतर शिवसेना वाढली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. 40 खोके आमदार गेले तरी जनता आमच्यासोबतच असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा देखील जोरदार समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत 

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.  बंडखोरीनंतर शिवसेना वाढली.   आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. 40 खोके आमदार गेले तरी जनता आमच्यासोबतच असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पर्यटनमंत्र्यांना तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे,  ते शिवरायांची तुलना बेईमान व्यक्तीशी करतात असं म्हणत त्यांनी प्रगंलभप्रभात लोढा यांना देखील टोला लगावला  आहे.

हेही वाचा :  माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर.., उदयनराजे संतापून स्पष्टच बोलले

लोढा यांच्यावर निशाणा  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा भाजप नेते, मंत्री मगंलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाची तुलना महाराजांच्या  आग्र्याहून सुटकेशी केली आहे. यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर घणाघात केला आहे. खोके सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कोण शिवरायांचा जास्त अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू आहे. दिल्लीने सांगितले म्हणून हे शिवरायांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनमंत्र्यांना तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे,  ते शिवरायांची तुलना बेईमान व्यक्तीशी करतात असं म्हणत त्यांनी प्रगंभप्रभात लोढा यांना टोला लगावला  आहे.

हेही वाचा : बाप गवंडी तर आई करते शिवणकाम, परिस्थितीवर मात करत तरुण UPSC पास

लोढा यांनी काय म्हटलं होतं? 

लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाची तुलना महाराजांच्या  आग्र्याहून सुटकेशी केली आहे. ज्याप्रमाणे शिवराय आग्र्यातून बाहेर पडले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे, आता यावरून वादाला सुरुवात झाली आहे.

First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray