मुंबई, 08 ऑगस्ट: शिवसेना (Shivsena Leader) नेते खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत 'मातोश्री'वर pic.twitter.com/6UDnhaVkgt
— News18Lokmat (@News18lokmat) August 8, 2021
भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. पक्ष संघटना यावरच चर्चा झाल्याचं ते म्हणालेत. तसंच मराठा आरक्षण संदर्भात घटनात्मक माहिती अशोक चव्हाण सगळ्यांना देणार असल्याची माहिती राऊतांनी यावेळी दिली. संसदेत मराठा आरक्षण घटनात्मक चर्चा मागणार असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करायला मिळणार का?, उद्या होणार निर्णय संजय राऊतांनी दिल्लीत होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवरही या बैठकीत चर्चा झाली आहे. याव्यतिरिक्त अन्य महत्वाच्या राजकीय विषयांवरही संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे.