मुंबई, 08 ऑगस्ट: राज्यात (Maharashtra State) कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आता ओसरली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (District)कोरोना रुग्ण (Corona patient) आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचं मत राज्याच्या टास्क फोर्सनं (Task Force) व्यक्त केलं आहे. अशातच उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक (Meeting) होणार आहे.
या बैठकीत मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करायला मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे. दोन लस डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी ही मागणी केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून हवी आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आणि विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या होणार टास्क फोर्सची बैठक महत्वाची असेल.
अरे बापरे! मैदानातून धावत येत बैलाने प्रेक्षकांवरच घेतली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
पुढील दोन महिने धोक्याचे- कोविड टास्क फोर्स
राज्य सरकारनं राज्यातील निर्बंध शिथिल केले असले तरीही पुढचे दोन महिने धोक्याचे असल्याचं मत टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलं आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी मृत्यूंचं प्रमाण शून्यावर आणण्याचं लक्ष्य आहे, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात सध्या कोरोना चाचण्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे निदानाचे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र कोरोना पूर्णपणे गेलेला नाही आहे. हे गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. येत्या काळ म्हणजेच पुढील दोन महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. येत्या दोन महिन्यात बरेच सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांचे परिणाम येत्या दोन आठवड्यांमध्ये लक्षात येतील, असं कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.
कळव्यात 6 घरांवर कोसळली दरड, 25 कुटुंबियांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
याआधी निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांच्या वागण्यामुळे संसर्ग वाढल्याचे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागले पाहिजे, असंही शशांक जोशी म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai local