स्वप्नील एरंडोलिकर, प्रतिनिधी सांगली, 13 फेब्रुवारी: मिरजेतील मिरासाहेब दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडविणारं धार्मिक केंद्र आहे. रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या या दर्ग्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गेल्या 700 वर्षापासून हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा हा दर्गा जोपासत आहे. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकही या ठिकाणी येत असतात.
हजरत मीरासाहेब सुफी संत हजरत मीरासाहेब हे एक सुफी संत होते. अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लाममधील सुफी विचारांचा प्रचार केला. त्यामुळे सुफी संत म्हणून ते हिंदू आणि मुस्लिमांसाठी आराध्य ठरले आहेत. हजरत मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमशुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी हजारो लोक दरगाहकडे येतात. दरवर्षी साजरा होणाऱ्या उरुसालाही लाखो लोकांची मांदियाळी या ठिकाणी होत असते. सांगलीच्या गुलाबाचा देशात डंका! 2 एकरातून करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO यंदा 648 वा उरुस महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्याचा यंदा 648 वा उरुस आहे. 16 फेब्रुवारीपासून उरुसाला सुरुवात होणार आहे. उरुसात मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. त्यामुळे दर्गा कमिटीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दर्गा आवारात दहा दिवस आधी मंडप उभारणी करण्यात येते. Miyawaki Method : जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video चर्मकार समाजाला मान उरुसाच्या आदल्या रात्री संदल लेपन विधी होतो. उरुसाच्या पहिल्या दिवशीचा मान हिंदू चर्मकार समाजाला असतो. पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात येतो. त्यानंतर दिवसभर विविध सामाजिक संस्था व भाविकांचे गलेफ अर्पण करण्यात येतात आणि रात्री कव्वालीचा कार्यक्रम होतो. ‘होय, आम्ही चोऱ्या करतो!’ आजही या पद्धतीनं ओळख करुन देणारा समाज माहिती आहे? Video शासनाचा गलेफ, संगीत महोत्सव मीरा साहेबांच्या उरुसाला शासनातर्फेही गलेफ अर्पण केला जातो. तहसीलदार कार्यालय आणि पोलीस प्रशासनाचे गलेफ अर्पण होत असतात. उरूसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दर्गा खादीम जमात आणि दर्गा कमिटीचे असगर शरीक मसलत यांनी दिली आहे.

)







