सांगली, 19 फेब्रुवारी : शिवजयंतीच्या निमित्ताने सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जिल्ह्यातील 100 कलाशिक्षकांनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या शंभर कलाशिक्षकांनी मिळून शिवराज्याभिषेकाची महारांगोळी साकारली आहे. शिवराज्याभिषेकाची ही विक्रमी रांगोळी साकारण्यासाठी त्यांनी 15 फेब्रुवारीपासूनच सुरूवात केली होती. 250 बाय 550 फूट या आकारात ही महारांगोळी साकारण्यासाठी 30 टन रांगोळी वापरण्यात आली आहे. गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक अशा 9 बुकमध्ये या महारांगोळीची नोंद होणार आहे.