प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 11 फेब्रुवारी: आपल्या देशात अनेक जाती धर्म आहेत, पूर्वीच्या काळी व्यवसायावरून जातीचे नाव संबोधले जात होते. त्यामुळे अनेक समाज आज ही त्याच नावाने ओळखले जातात. लोहार, चांभार, सुतार या व्यवसायावरून तयार झालेल्या जाती आपल्या परिचयाच्या असतील. आपला विश्वास बसणार नाही पण व्यवसाय म्हणून चोरी करणारा सुद्धा एक वर्ग आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डामध्ये समाजातील मंडळींचं वास्तव्य आहे.
होय, आम्ही चोऱ्या करतो चोरी करणं आपल्याकडे निशिद्ध मानलं जातं. परंतु, चोरी करणं हाच मुख्य व्यवसाय असणारा भामटा राजपूत समाज म्हणून ते ओळखले जातात. अहमदनगरमधील खर्डा शहराला पूर्वी बोली भाषेत ‘भामट्यांचं खरडं’ म्हणूनच ओळखलं जात होतं. याच खर्डा शहरात या समाजाची वसती आहे.
Ahmednagar : बॉम्बचा मारा, घातक मिसाईल, शत्रूवर तुटून पडणारे जवान, काळजाचा ठोका चुकवणारा युद्ध सराव Videoनिंबाळकरांच्या सेवेत
निजामशाहीच्या काळात अहमदनगर भागात निंबाळकर घराण्याची सत्ता होती. 1600-1700 कालखंडमध्ये हे सर्व राजपूत मंडळी सरदार निंबाळकर यांच्या सेवेत होते. पुढे निंबाळकरांची कत्तल झाल्यानंतर किल्लेदार सोनू सिंग यांनी किल्ला सांभाळला. तेव्हा हा समाज लष्करात काम करत होता. चांगलं काम केल्यानंतर त्यांना इनामी जमिनी दिल्या जात होत्या. त्यामुळे त्या काळी या समाजचे वाडे व आर्थिक स्थैर्य होतं.
काळ्या मसाल्याचे ‘सम्राट’, 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Videoब्रिटिशांच्या सत्तेत बेरोजगार
पुढे ब्रिटिशांची आक्रमणे झाली आणि मराठ्यांची राजवट संपुष्टात आली. तेव्हा इनामी मिळालेल्या सर्व जमिनी 1827 कायद्याचा निकष लावत जप्त केल्या. इनामी जमिनीचे कागदपत्रे दाखवा आणि जमीन घ्या असा तो कायदा होता म्हणून हा समाज बेरोजगार झाला. त्यांच्या हाताला काही काम राहील नाही. उदरनिर्वाहासाठी शेती आणि लष्कर हे दोनच पर्याय होते. शेती जप्त झाल्यामुळे बेरोजगारी वाढली म्हणून हा समाज गुन्हेगारीकडे वळला. पोटासाठी त्यांना चोरी करावी लागली. खर्डा येथूनच आधी भामटा हे नाव पडलं. ते देश भरात झालं. स्वातंत्र्यपूर्वी या जातीस गुन्हेगार जात म्हणून संबोधिले जात होते. आजही भामटा राजपूत असाच उल्लेख होतो.
Ram Mandir Ayodhya : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी राम मंदिर उडवण्याची दिली धमकी, अखेर असा झाला शेवटजातीच्या नावामुळे अडचणी
भामटा राजपूत हा समाज मूळचा उत्तर भारताला आहे. त्यांची बोलीचाली वेगळ्या आहेत. विमुक्त जाती मध्ये या समाजाचा समावेश आहे. मात्र त्यांच्यात शिक्षणाचा आभाव दिसतो. त्यातच जातीच्या नावामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षण घेऊन ही इथल्या विद्यार्थ्यांना काम, नोकरी मिळत नाही. कोणत्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अशी खंत इथले लोक बोलून दाखवतात.