सांगली, 1 फेब्रुवारी : जपानमधील मियावाकी तंत्रज्ञानाच्या आधारे सांगली त कृत्रिम जंगल विकसित करण्यात आलं आहे. जपानमधील बॉटनिस्ट अकीरा मियावाकी यांनी कमी वेळात घनदाट जंगल उभं करण्याची पद्धती विकसित केली. त्या तंत्राच वापर करून सांगलीत चार प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. मियावाकी जंगल खास पद्धतीने विकसित करण्यात येते. हे जंगल दीर्घकाळ हिरवे राहते. कमी वेळात जास्त हिरवाई आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देणं ही या जंगलाची विशेषता आहे. या जंगलामुळे शहरातील हिरवळ आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण राहण्यास मदत होते. सांगली जिल्ह्यात मिरज, कुपवाड, तुंग आणि नांगोळे येथे असे चार मियावाकी प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले. त्यातला तुंग येथील प्रकल्प खासगी जागेवर आहे. शहरी भागातील अनंत समस्यांना सामोरे जाऊनही शाश्वत हिरवाई कशी निर्माण केली जाऊ शकते, याचा दाखला घालून देणारे असे आणखी उपक्रम व्हायला हवेत. संपूर्ण महापालिका क्षेत्राची मियावाकी प्रकल्पांचे आगर अशी ओळख निर्माण करण्याचे नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे ध्येय आहे.
चार प्रकल्प फेब्रुवारी २०२० मध्ये मिरजेत झारीबाग परिसरात पालिकेच्या दहा गुंठ्यांच्या खुल्या भूखंडापैकी पाच गुंठे जागेत पहिला प्रकल्प पालिकेच्या सहकार्याने उभा केला. त्यात ५२ प्रजातींची १५०० झाडे लावली. पालिकेच्या सहकार्यातून नोव्हेंबर २०२० मध्ये नांगोळे येथे ‘जलबिरादरी’च्या सहकार्यातून डोंगरउताराला वन विभागाच्या साडेसहा गुंठे जागेत दुसरा प्रकल्प उभा केला. त्यात ४२ प्रजातींची १६०० झाडे लावली. Nagpur : वन्य प्राण्यांचा शेतीला त्रास होतोय? ‘हा’ उपाय करेल तुमची सुटका, Video जुलै २०२१ मध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या वनस्पतीशास्त्रीय बागेत ३ गुंठ्यांत ४० प्रजातींची ६५० झाडे लावली आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तुंग येथे विक्रम पुरोहित यांच्या फार्महाऊस शेजारील ३ गुंठे जागेत ४० प्रजातींची ६०० झाडे लावली आहेत. स्थानिक प्रजातींची ही झाडे असून, अवघ्या दोन वर्षांत या सर्व झाडांची वाढ एरव्हीपेक्षा अधिक झाली आहे. या झाडांची लागवड यात पिंपळ, नांद्रुक, पिपरणी, कांचन हिरडा, बेहडा, काटेसावर, देवसावर, ऐन, जांभूळ, आंबा, फणस, भेर्ली माड, पळस, पांगारा, खैर, सीताअशोक, माकडलिंबू, कारवी, अग्निमंथ, कवठ, नागचाफा, रिठा, शिवण, गूळभेंडी, बहावा, करंज, शिसम, उंडी अशा सुमारे 55 प्रजातींची अस्सल भारतीय स्थानिक झाडे लावण्यात आली. Blackbuck : सोलापूर जिल्ह्यातील काळविटांना कशाचा आहे सर्वाधिक धोका? पाहा Video काय आहे हा मियावाकी प्रकल्प? जगप्रसिद्ध जपानी शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी सुमारे 60 वर्षे नैसर्गिक नवनिर्मितीच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून त्याच्याशी मिळतीजुळती कृत्रिम नवनिर्मितीची पद्धत विकसित केलेली आहे. यात सर्वप्रथम जिथे झाडे लावायची तिथले माती परीक्षण केले जाते आणि जमिनीची सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पोषणमूल्य तपासले जाते. मग संपूर्ण माती 1 मीटर खोलीपर्यंत उकरून काढून त्यात तांदूळ किंवा गव्हाची साळ, कोकोपीट, शेणखत, जीवामृत असे घटक गरजेप्रमाणे मिसळले जातात आणि माती परत खड्यात भरून घेतली जाते. 10 पट वेगाने वाढ अशा प्रकारे तयार झालेल्या बेडवर खूप कमी अंतरावर स्थानिक प्रजातींची भरपूर झाडे लावली जातात. मग पोषक जमीन आणि सूर्यप्रकाशासाठीची स्पर्धा यामुळे झाडे नेहमीपेक्षा 10 पट अधिक वेगाने वाढतात आणि 2 ते 3 वर्षांत पुढे कोणतीही निगा न लागणारे समृद्ध जंगल तयार होते.