जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कृष्णामाई माफ कर! छोट्यांचा खच तर मोठे मासे मेल्याचे पाहून सांगलीकर हादरले, VIDEO

कृष्णामाई माफ कर! छोट्यांचा खच तर मोठे मासे मेल्याचे पाहून सांगलीकर हादरले, VIDEO

कृष्णामाई माफ कर! छोट्यांचा खच तर मोठे मासे मेल्याचे पाहून सांगलीकर हादरले, VIDEO

सांगली नजीकच्या अंकली या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 10 मार्च : सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. सांगली नजीकच्या अंकली या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाले आहेत, आणि मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीच्या कृष्णा नदी येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे.

जाहिरात

भले मोठे मासे देखील या ठिकाणी आता मृत पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातलं सोडण्यात येणारा दूषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जाते आता प्रदूषण महामंडळ याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.

लग्न होत नाही म्हणून काढली जाते गाढवावरून वरात, वर्षभरानंतर रिझल्ट समोर

दुषित पाण्यामुळे आजारांना निमंत्रण, नागरिक त्रस्त

हिंगोलीच्या कन्हेरगाव नाका या मोठ्या लोकवस्तीच्या गावामध्ये नळांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला अनेकदा दुर्गंधी देखील येत आहे. पिण्याच्या योग्य हे पाणी नाहीच परंतु आंघोळीला जरी वापरले तर अंगाला खाज येणे पुरळ येणे असे आजार होत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून शुद्ध पाणी देण्याची मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.

जाहिरात
कुत्रा समजून घरी आणला भलताच खतरनाक प्राणी; शेवटी व्यक्तीची झाली भयंकर अवस्था

कन्हेरगाव नाका या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जुनी पाणीपुरवठा योजना आहे. पैनगंगा नदीकाठच्या पाणीपुरवठाच्या विहिरीमध्ये दूषित व गढूळ पाणी आहे. हेच पाणी नळांद्वारे गावकऱ्यांना येतं. ग्रामस्थांना नाईलाजाने वापरण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो परंतु पिण्याचे पाणी मात्र विकत घ्यावं लागतं. अनेकांना पाणी विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना चांगल्या पाणीपुरवठ्याची सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात