जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli Police : तो पुष्पा कोण? चोरट्यांचे पोलिसांना थेट आव्हान पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे चोरली

Sangli Police : तो पुष्पा कोण? चोरट्यांचे पोलिसांना थेट आव्हान पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे चोरली

Sangli Police : तो पुष्पा कोण? चोरट्यांचे पोलिसांना थेट आव्हान पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे चोरली

सांगली पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतच चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी झाल्याची घटना समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थाच रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : मागच्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात चंदनाच्या झाडांच्या कत्तलीच्या केसेस समोर आल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपयांची चंदन चोरी पकडण्यात आली होती. हा घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सांगली पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतच चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी झाल्याची घटना समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थाच रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे. (Sangli Police)

जाहिरात

सांगली पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत चंदनाची झाडे आहेत त्या झांडांची रात्रीतून अज्ञातांनी कत्तल करून चोरी केली आहे. सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने पोलीस मुख्यालय परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंदनाच्या या झाडाच्या चोरीची विश्रामबाग पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

हे ही वाचा :  चक्रीवादळाची दिशा बदलली, कोकण वगळता राज्यात पाऊस थांबणार

सांगली पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. चार वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारी असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यावेळी झाडे चोरीला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. हा प्रकार राज्यभर गाजला होता. यावेळी मात्र चोरटे तेथीलच ट्रॅफिक पार्कमधील दोन झाडांचे बुंधे घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत. झाडे चोरीला गेल्याची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली आहे.

जाहिरात

ही चोरी शुक्रवारी पहाटे 2.30 ते 3 च्या दरम्यान घडली आहे. ही चोरी पोलीस मुख्यालयाच्या टॅफिक पार्कमध्ये झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई दिपक तुकाराम वडेर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद  दिली आहे. चोरट्यांनी संबंधित झाडे करवतीने कापली असल्याचे आढळले आहे. फांद्या तिथेच कट करून दोन मोठे बुंधे पळवले आहेत.  

जाहिरात

हे ही वाचा :  शिंदे-फडणवीसांचा निर्णय चुकीचा, खडसेंनी भाजपमधलाच अनुभव जाहीरपणे सांगितला

याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील हे करत आहेत. चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालयाच्या परिसरात घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. दरम्यान चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्यासारखेच झाल्याची चर्चा आहे.

जाहिरात

यापूर्वी चंदन चोरट्यांनी चक्क पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या कुंपना जवळची चंदनाची झाडे कापली होती. आता पुन्हा चोरटे चोवीस तास पोलिसांचा वावर असलेल्या पोलिस मुख्यालय परिसरात घुसून चोरी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात