मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शरयूची आरती रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शरयूची आरती रद्द

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या टॉप 05 बातम्या वाचा एका क्लिकवर.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : येस बँकेवर आरबीआयने घातलेल्या निर्बंधापासून ते उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापर्यंत देश आणि राज्यातील टॉप 05 बातम्या एकाच क्लिकवर.

1. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे.या आधी जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येत, श्री राम जन्मभूमीच्या दर्शानाला आले होते. तेव्हा त्यांच्या दौऱ्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती.

सविस्तर बातमी वाचा-उद्धव ठाकरे आज राम जन्मभूमीत, असा असेल अयोध्या दौरा!

2. येस बँकेवर सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले आहे.

सविस्तर बातमी वाचा-येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर ईडीचे छापे

3. कोरोना व्हायरस प्रभावित इराण देशामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर येथील 44 नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी एक पत्र लिहित विनंती केली आहे.

सविस्तर बातमी वाचा-महाराष्ट्रातील 44 नागरिक इराणमध्ये अडकले, श्रीनिवास पाटलांनी लिहिलं मोदींना पत्र

4. 'मराठी मालिकांसाठी यांना फक्त ब्राह्मण अभिनेत्रीच का मिळतात,' असा सवाल करत दिगदर्शक सुजय डहाके याने मराठी चित्रपटश्रृष्टीत अजूनही जातीभेद केला जात असल्याचा आरोप करून खळबळ उडून दिली आहे. त्यानंतर सुजय डहाके याच्या बाजूने आणि विरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही याबाबत भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी वाचा-जातीयवादाचं विष पसरवण्यासाठी काही लोक कार्यरत, विक्रम गोखले यांचा गंभीर आरोप

5. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केलं. शेतकरी, महिला सक्षमीकरण, उद्योगाला चालना आणि पर्यटन विकासावर महाविकास आघाडी सरकारनं भर दिला. यासोबतच राज्यात बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती करण्यावर आणि स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचा-स्वस्त घरं, स्थानिकांना नोकऱ्या आणि महिलांना संरक्षण असं आहे ठाकरे सरकारचं बजेट

First published: March 7, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading