पुणे, 6 मार्च : ‘मराठी मालिकांसाठी यांना फक्त ब्राह्मण अभिनेत्रीच का मिळतात,’ असा सवाल करत दिगदर्शक सुजय डहाके याने मराठी चित्रपटश्रृष्टीत अजूनही जातीभेद केला जात असल्याचा आरोप करून खळबळ उडून दिली आहे. त्यानंतर सुजय डहाके याच्या बाजूने आणि विरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सुजय डहाके याने केलेल्या वक्तव्यावर तुमचे मत काय? असा प्रश्न विक्रम गोखले यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी अजूनपर्यंत सुजय डहाके यांनी केलेलं विधान वाचले किंवा ऐकले नाही. पण यामध्ये जातीयवाद नकोच.’ पुढे बोलताना मात्र विक्रम गोखले यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘मराठी चित्रपटश्रृष्टीत काही वर्षांपासून जातीयवाद सुरू झाला आहे आणि हे जातीय विष पसरवण्यासाठी काही लोक कार्यरत आहेत,’ असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी केला आहे.
#NewsAlert गेल्या काही वर्षांपासून जातीयवादाचं विष पसरवलं जात आहे आणि त्यासाठी काही लोक कार्यरत, विक्रम गोखले यांचा गंभीर आरोप pic.twitter.com/Py4HVWpnai
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
सुजय डहाकेचं वक्तव्य आणि निर्माण झालेला वाद मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाके यानं उपस्थित केला. ‘मी स्वत: एका मीटिंगमध्ये होतो, तिथं म्हटलं गेलं की ती गायकवाड लागू बंधूच्या जाहिरातील काम कसं करणार? असं बोललं गेलं,’ असा धक्कादायक दावा सुजय डहाके याने केला आहे. ‘हा कोण येतो डहाके…याला कसा मिळतो राष्ट्रीय पुरस्कार…याचा अनेकांना राग आहे,’ असा आरोपही त्याने केला आहे. सुजय डहाके याने मांडलेल्या भूमिकेनंतर वाद निर्माण झाला. अभिनेता शशांक केतकर, सौरभ गोखले आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी या वक्तव्याप्रकरणी सुजय डहाके याच्यावर टीका केली. तर या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेत सुजय डहाकेला पाठिंबा दर्शवला आहे.

)







