जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटात गेले, अवघ्या 24 तासात पुन्हा शिवसेनेत परतले; पुण्यातील सेना विभागप्रमुखांना अश्रू अनावर 

शिंदे गटात गेले, अवघ्या 24 तासात पुन्हा शिवसेनेत परतले; पुण्यातील सेना विभागप्रमुखांना अश्रू अनावर 

शिंदे गटात गेले, अवघ्या 24 तासात पुन्हा शिवसेनेत परतले; पुण्यातील सेना विभागप्रमुखांना अश्रू अनावर 

काही तासांपूर्वी ते शिंदे गटात गेले होते. मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांना याचं खूप वाईट वाटलं. माध्यमांशी बोलताना तर त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडू लागले.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 24 जुलै : पुण्यातील अनेक अजब गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या असतील. मात्र एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेला एक सच्चा शिवसैनिक अवघ्या काही तासात पुन्हा शिवसेनेत आल्याचा प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक आमदार, नेते यांनी शिंदे गटाची वाट धरली. मात्र कोणीच परतलं नाही. पहिल्यांदाच पुण्यातील सेनेचे विभागप्रमुख शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा सेनेत परतले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पुण्यातील शिवसेनेच्या गोखलेनगर विभागातील विभाग प्रमुख राजेश विटकर शिंदे गटात सहभागी झाले. मात्र काही तासातच ते पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. मी कुणाच्या सांगण्यावरूनही शिंदे गटामध्ये गेलो नव्हतो. पण, जेव्हा पुण्यात परत आलो तेव्हा टिव्हीवरील शिवसेना फुटीच्या बातम्या पाहून मला खूप वाईट वाटलं. म्हणूनच अवघ्या 24 तासात मी शिवसेनेत परत आलो. हे सांगताना तम्मा उर्फ राजेश विटकर यांच्या डोळ्यात आपसूकच अश्रू घळघळले. त्यांचा बांध फुटला. त्यांनी आपल्या या भावनांना न्यूज18 लोकमतच्या कँमेऱ्यासमोर वाट मोकळी करून दिली. शिवसेनेत परत आलेल्या या तम्मा उर्फ राजेश विटकर यांचा त्यांच्याच गोखलेनगर शिवसेना शाखेवर आज जाहिर सत्कारही करण्यात आला.. दरम्यान बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) यांची शिवसेना (shivsena) जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह एक जिल्हा प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख आणि 3 तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढून टाकले आहे. शिवसेनेमध्ये आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात