पुणे 19 जुलै : शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान करण्यासाठी 2009 सालीच सेना-राष्ट्रवादीची युती होणार होती. त्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढणार होते. मात्र मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला. मात्र पुढे हा डाव 2019 ला केला गेला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी लांडेवाडी येथील पत्रकार परिषदेत केला आहे. दिल्लीत शिंदे गटाकडून झाली चूक, लोकसभा सचिवालयाने पत्र परत पाठवले, खासदारांचे बंड झाले फेल? शिवनेरी निवासस्थान येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आपल्यावर शिवसेनेने अन्याय केला असून मनाला खूप वेदना झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, की 18 वर्ष प्रामाणिक राहून माझी आधी हकालपट्टी केली आणि मग सारवासारव केली, हे पटलं नाही. मनाने शिवसेनेसोबत असून सोबत मात्र एकनाथ शिंदेच्या आहे, हे सांगायला आढळराव विसरले नाहीत. आढळरावांची सेनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र यानंतर काहीच वेळात सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली होती, असं शिवसेनेने म्हटलं होतं. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही आढळरावांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतंय, कदमांनी मंत्रालयातील गोष्टी केल्या उघड! शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.