जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्याच्या ट्रॅफिकमुळे मुख्यमंत्र्यांची भेट हुकली; कार्यक्रमाचं आयोजन केलं, पण नगरसेवकांचीच गैरहजेरी

पुण्याच्या ट्रॅफिकमुळे मुख्यमंत्र्यांची भेट हुकली; कार्यक्रमाचं आयोजन केलं, पण नगरसेवकांचीच गैरहजेरी

पुण्याच्या ट्रॅफिकमुळे मुख्यमंत्र्यांची भेट हुकली; कार्यक्रमाचं आयोजन केलं, पण नगरसेवकांचीच गैरहजेरी

सर्वसामान्यांना तर पुण्याच्या वाहतुक खोळंब्याचा त्रास सहन करावा लागतो. आता तर लोकप्रतिनिधींनींची मुख्यमंत्र्यांची भेटच हुकली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 जुलै : उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आषाढी एकादशीच्या पुजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत. दरम्यान दिल्लीहून त्यांनी थेट पुणेच गाठलं आणि येथूनच पंढरपूरची वाट धरली. तत्पूर्वी त्यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिंदेशाही पगडी घालून स्वागत करण्यात आलं. खासदार गिरीष बापट यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी किरण साळी देखील सीएम यांच्या स्वागताला हजर होते. याशिवाय आमदार तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला हजर होते. नगरसेवक नाना भानगिरे आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत.

जाहिरात

मुख्यमंत्र्यांनी हडपसर येथे कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र पुण्याच्या ट्रॅफिकमुळे (Pune Traffic) शिंदे गटात सामील झालेले नगरसेवक नाना भानगिरे यांना वेळेत कार्यक्रमाला पोहोचला आलं नाही. आतापर्यंत सर्वसामान्य पुणेकरांना वाहतुकीच्या खोळंब्याचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकदा ऑफिसला जायला उशीरही होतो. आता तर लोकप्रतिनिधींचीही मुख्यमंत्र्यांसोबत होणारी भेट हुकली. विशेष म्हणजे नाना भानगिरे यांनीच मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र दुर्देवाने तेच कार्यक्रमाला पोहोचू शकले नाही. दरम्यान सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारचा शपथविधी 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. गुरुपौर्णिमा (Guru pournima 2022) असल्याने 13 जुलैला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीकडे जी खाती होती, ती भाजपकडे जातील तर  शिवसेनेकडे जी खाती होती ती एकनाथ शिंदे गटाकडे जातील, असं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात