जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन परत यावं,' संजय राऊत यांनी शिंदेंना डिवचलं

'भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन परत यावं,' संजय राऊत यांनी शिंदेंना डिवचलं

'भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन परत यावं,' संजय राऊत यांनी शिंदेंना डिवचलं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत तर भाजपाचे आहेत, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत तर भाजपाचे आहेत, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत भाजपाची सत्ता आहे.  बेळगावसह सीमाभागाचा प्रश्व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या भागात मराठी भाषिकांवर अन्याय होत असून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तो भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे मांडायला हवी. तो निर्णय घेऊन त्यांनी महाराष्ट्रात यायला हवं,’ अशी मागणी राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार गेल्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास सहन करावा लागतोय, अशी आपल्याला माहिती बेळगावच्या शिष्टमंडळानं दिली आहे, असे राऊत यांनी सांगितले. हे मुख्यमंंत्री शिवसेनेचे आहेत, तर ते मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीत का गेले आहेत. शिवसेने हायकमांड मुंबईमध्ये आहेत. असे राऊत म्हणाले.‘महाराष्ट्राचे तुकडे, मुंबईचे तुकडे, महाराष्ट्रातील उद्योग राज्याच्या बाहेर जाण्याची परवानगी सरकार देणार का?’ असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. ‘पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि आता भाजपाचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी याकडं गांभीर्यानं पाहावं’ असा टोला राऊत यांनी लगावला. ‘द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल. या विषयावर दिल्लीत वेगळी बैठक नाही तर विचारांचं आदान-प्रदान झालं असेल, अलिकडं मध्यरात्री विचारांचं आदान-प्रदान होतं.’ असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप, आता शिवसेना खासदारही बंडाच्या तयारीत महाराष्ट्राचे 3  तुकडे करण्याचा विचार यापूर्वी संजय राऊत यांनी ‘सामना’ मधील संपादकीमधून मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर टोलेबाजी केली आहे. ‘महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल, हात पुढे केला की हवे ते मिळेल. कारण महाराष्ट्रात दिल्लीच्या मनाप्रमाणे घडले आहे व श्री. शिंदे व त्यांच्या लोकांनी दिल्लीस हवे तसे करून दिले आहे. प्रश्न राहता राहिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व अखंडतेचा. महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका! महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे.’ असं राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात