मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Bhima Koregaon Case: कोरेगाव भीमा प्रकरण; शरद पवारांना चौकशी आयोगाकडून समन्स, 23 फेब्रुवारीला आयोगासमोर नोंदवणार साक्ष

Bhima Koregaon Case: कोरेगाव भीमा प्रकरण; शरद पवारांना चौकशी आयोगाकडून समन्स, 23 फेब्रुवारीला आयोगासमोर नोंदवणार साक्ष

Bhima Koregaon case inquiry commission summons NCP Chief Sharad Pawar for witness : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे.

Bhima Koregaon case inquiry commission summons NCP Chief Sharad Pawar for witness : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे.

Bhima Koregaon case inquiry commission summons NCP Chief Sharad Pawar for witness : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 9 फेब्रुवारी : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात (Koregaon Bhima Case) चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार असून त्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचा झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत.

शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलेलं. त्यानंतर या प्रकरणात अॅड प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.

वाचा : आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

यापूर्वी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना समन्स

कोरेगाव भीमा प्रकरणाची आयोगाच्या मार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता.

कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे ADG law and order व शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले होते. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते.

कोरेगाव भीमाची लढाई

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818मध्ये झालेल्या लढाईत इंग्रजी फौजांचा विजय झाला आणि पेशव्यांचा पराजय. इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या 500 महार सैनिकांनी प्रचंड शौर्य दाखवत पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला रोखून धरलं. या विजयाची आठवण म्हणून इंग्रजांनी तिथे विजयस्तंभ उभारला. महारांच्या तुकडीच्या शौर्याचं प्रतिक म्हणून तिथे विजय दिवस साजरा केला जातो. 1 जानेवारीच्या त्या लढाईच्या संदर्भांबाबत आजही इतिहासकारांमध्ये दुमत आहे. इतिहासकारांच्या मते, 1 जानेवारी 1818 रोजी मराठा साम्राज्य सांभाळणारे दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. पुण्यातून राज्य चालवणाऱ्या पेशव्यांकडून ब्रिटिशांनी पुणं काबीज केलेलं होतं. पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता. तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह इंग्रजांवर हल्ला केला. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत 500 महार सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं. एक इंचही पुढे सरकू दिलं नाही. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली त्यामुळं पेशव्यांनी आहे त्या परिस्थितीत युद्धातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांचा विजय झाला, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे 600च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले. ही लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती. या लढाईत महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला. भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला गेला आणि त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरली आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला विजय दिन

1 जानेवारी 1927मध्ये बाबासाहेब आंबेडकारांनी सर्वातआधी विजय दिन सोहळा साजरा केला. त्यावेळी मोठ्या संख्येने दलित समाज उपस्थित होता. त्यानंतर 1945मध्ये भारतीय सैन्यदलात आंबेडकरांमुळे महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. त्यामुळं दरवर्षी महार रेजिमेंट आणि दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित असतो.

First published:
top videos

    Tags: Pune, शरद पवार