मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी, भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना समन्स

मोठी बातमी, भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहे.

पुणे, 22 ऑक्टोबर : फोन टॅपिंग प्रकरणामुळे (phone tap case) अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (rashmi shukla) आणि 100 कोटी वसुली प्रकरणामुळे बेपत्ता असलेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी (Bhima Koregaon case ) चौकशी आगोयाने दोघांनाही समन्स बजावला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगाच्या मार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे ADG law and order व शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तुमच्यासाठी कायपण!'त्या'सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; 'सुख म्हणजे नक्की काय असतं दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला  पोलीस महासंचालक आणि  राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसंच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते. Alert! कांद्यामुळे 652 जणांना गंभीर संसर्ग; चुकूनही खाऊ नका असा Onion याबाबत एक अहवाल देखील त्यांनी तयार केला होता याच प्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात युद्ध छेडले असून रश्मी शुक्ला यांना या प्रकरणी जबाब देण्यास मुंबई पोलिसांनी भाग पाडले. त्यानंतर आता पुन्हा एकदा भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलवले आहे.
First published:

पुढील बातम्या