पुणे 16 जुलै : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बारामती दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ते तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी गेले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी जीएसटी, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिवसेनेच्या चिन्हासारख्या अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. जीएसटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. जीएसटीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो. नवीन जे अर्थमंत्री होतील त्यांनादेखील मी याबाबत विनंती करणार आहे. औरंगाबाद (Aurangabd Renaming), उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचं नामांतर ठाकरे सरकारने केलं होतं. मात्र, तो निर्णय रद्द करत आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराची नव्याने घोषणा केली. नामांतराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की अनेकदा पाठीमागच्या सरकारने घेतलेले निर्णय फेरविचारासाठी घेतले जातात. तो त्यांचा अधिकार आहे. जे जनतेच्या हिताचे निर्णय असतात ते घेतले जातात. आम्ही तसे निर्णय घेतले आहे. Ajit pawar Baramati : सरकार पडल्यावर अजित पवार बारामतीत, सत्ता असो वा नसो बारामतीचा विकास थांबणार नाही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की विश्वासदर्शक ठराव पास केला, अध्यक्ष नेमला मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही हे कळत नाही. पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेच्यावतीने मी विनंती करतो आहे, की मंत्रिमंडळ विस्तार करावा. अतिवृष्टीमुळे लोकांना त्रास करावा लागतो तो दूर करावा, अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उपलब्ध करून द्यावी लागतील. ज्यांची घर पडली आहेत त्यांना मदत करावी, असंही पवार म्हणाले. सेनेच्या चिन्हासाठी निवडणूक पुढे ढकलल्याच्या आरोपावरही अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, की आरोपांमध्ये तथ्य नसत. आरोपाला उत्तर द्यायला मी रिकामा नाही. वस्तुस्थिती समोर आल्यावर मी प्रतिक्रिया देईल. रत्नागिरीतही शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील नगराध्यक्ष सरपंच निवडणूकीबाबतच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की नगराध्यक्ष थेट करता, सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा. राष्ट्रपतीदेखील थेट करा. लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत. त्याचं पालन करावं लागतं सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात आणि बॉडी दुसऱ्या विचारांची असते. त्यामुळे बॉडीला विचारून निर्णय घेत नाहीत. मग एक हाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते.. ज्यांच्याकडे मसल पावर आहे किंवा मणी पॉवर आहे तेच अशा प्रकारच्या निवडणूक लढवू शकतात दोघांचे मंत्रिमंडळ असल्याने त्यांनी हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत आहे, असंही पवार म्हणाले. मध्यवर्ती निवडणूकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की मध्यवर्ती निवडणूक होतील असं मला अजिताब वाटत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.