जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रत्नागिरीतही शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील

रत्नागिरीतही शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील

रत्नागिरीतही शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील

आमदारांपाठोपाठ अनेक ठिकाणचे नगरसेवकही शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता रत्नागिरीमधूनही एक मोठी बातमी समोर आली आहे (Ratnagiri Political News).

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी 16 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष दहा आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे आणि फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेला अनेक धक्के बसले आहेत.. आमदारांपाठोपाठ अनेक ठिकाणचे नगरसेवकही शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता रत्नागिरीमधूनही एक मोठी बातमी समोर आली आहे (Ratnagiri Political News). BREAKING : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला, 10 जणच घेणार शपथ, नावं गुलदस्त्यात? दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार योगेश कदम समर्थक म्हणून निवडून आलेले तीन नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहे. आम्ही शिवसैनिकच असल्याचा दावा त्यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. दापोली मंडणगड नगरपंचायतीचे शिवसेना बंडखोर नगरसेवक आमदार योगेश कदम यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. प्रताप सरनाईकांपाठोपाठ उदय सामंतही तयारीत, कोकणात सेनेला मोठे खिंडार? दापोली नगरपंचायत निवडणुकीत एबी फॉर्म देण्यावरून शिवसेनेत अंतर्गत कलह उफाळून आला होता. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी दापोली नगरपंचायतीची धुरा माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे नाराज शिवसेना आमदार योगेश कदम समर्थकांनी नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र या पॅनलला फारसे यश आले नव्हते. परंतु आमदार योगेश कदम समर्थकांच्या तीन सीट निवडून आल्या होत्या. आता दापोली नगरपंचायतीचे 3 नगरसेवक तर मंडणगड नगरपंचायतीचे 7 नगरसेवक असे मिळून 10 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात