मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात राडा! शरद पवारांच्या 'त्या' बैठकीला पंकजा मुंडेसह सुरेश धसांना नाकारला प्रवेश

पुण्यात राडा! शरद पवारांच्या 'त्या' बैठकीला पंकजा मुंडेसह सुरेश धसांना नाकारला प्रवेश

 प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवरच राडा

प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवरच राडा

प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवरच राडा

पुणे, 27 ऑक्टोबर: ऊसतोड कामगारांच्या करार नुतनीकरणाची आज (मंगळवारी) पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवरच राडा केला आहे. ऊसतोड आंदोलन पेटवणाऱ्या संघटनांनाच साखर संघाच्या करार बैठकीत प्रवेश नाही, असा आरोप केला जात आहे. हेही वाचा..महाविकास आघाडीत 12 जागांसाठी चुरस? उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक सुरेश धसांनाही नाकारला होता प्रवेश ऊस तोड कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. पण त्यांनी गेटवरच धरणे आंदोलन करताच त्यांना प्रवेश मिळाला. पण वंचितच्या प्रतिनिधीना अजूनही प्रवेश न मिळाल्याने त्यांनी इन्स्टिट्यूट गेटवरच राडा सुरू केला आहे. उसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला आधी आमंत्रण होतं. पण येथे पोहोचल्यावर आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस हे त्यांच्या समर्थकांसह वसंतदादा शुगर इनस्टीट्यच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचले आहेत. धस समर्थकांकडून याठिकाणी घोषणाबाजी सुरु आहे. आपल्याला आतमधे न सोडल्याने आपण प्रवेशद्वारसमोरच धरणं आंदोलन करणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांना बैठकीला प्रवेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडेंच्या भूमिकेला विरोध त्याच बरोबर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील बैठकीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेला पाच ऊसतोड कामगार संघटनांचा विरोध आहे. तोडणी दर, वाहतूक दर आणि मुकादमाचे कमिशन या मुद्द्यांवर सुरू असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर चिघळलेल्या या प्रश्नावर साखर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या चार बैठका निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी केलेल्या 21 रुपये दरवाढीच्या मागणीला अन्य ऊसतोड कामगार संघटनांनी विरोध केला आहे. याप्रश्नी “लवाद नकोच’ अशी भूमिका सातपैकी पाच संघटनांनी घेतील आहे. त्यामुळे आजची ही बैठक यंदाच्या गळीत हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे. पंकजांची भूमिका पाठीत खंजीर खुपसणारी पंकजा मुंडेंनी ही मागणी ऊसतोड कामगारांची नेत्या नाही कारखानदाराच्या भूमिकेतून केली आहे. मागील कराराच्या वेळीही त्यांनी ऊसतोड कामगारांची फसवणूक केली होती. यावेळी आम्हाला लवाद मान्य नाही. आमच्यावर लवाद लादण्यात आला तर त्याचे तीव्र परिणाम होतील, असा आरोप ऊस तोडणी व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केला आहे.
First published:

Tags: Pankaja munde, Pune, Sharad pawar, Suresh dhas

पुढील बातम्या