महाविकास आघाडीत 12 जागांसाठी चुरस? उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीत 12 जागांसाठी चुरस? उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर: राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत उद्या (बुधवारी) दुपारी साडे तीन वाजता कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत चुरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी चार नावं मंजूर करून ती राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा...कोराना लस मोफत! BJP चा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या

महाविकास आघाडी वतीनं 12 विधान परिषदेच्या सदस्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना संकटामुळे ही नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती.

राज्यपाल कोणाला पसंती देणार?

दरम्यान, गेल्या कॅबिनेट बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठकही झाली देखील झाली होती. मात्र, ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. आता राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्याची नावे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेला संघर्ष पाहता ते कोणाला पसंती देतात? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा..

भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचं नाव 12 जणांमध्ये असणार का? याबाबत देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप एकनाथ खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा..'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा दिलासा

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नावं...

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीत आता चुरस निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. असं असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नावं मंजूर करून ती राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 27, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading