मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Smartphone blast: सांगलीत तरुणाच्या खिशात OnePlus मोबाइलचा स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत

Smartphone blast: सांगलीत तरुणाच्या खिशात OnePlus मोबाइलचा स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत

OnePlus कंपनीच्या मोबाइलचा खिशात स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत, सांगलीत एकच खळबळ

OnePlus कंपनीच्या मोबाइलचा खिशात स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत, सांगलीत एकच खळबळ

सांगलीत एका तरुणाच्या खिशात मोबाइल फोनचा स्फोट झाला आहे. या घटनेत तरुणाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. (One Plus smartphone explosion in pocket)

सांगली, 21 जानेवारी : आपण दररोज वापरत असलेल्या मोबाइलचा स्फोट (Mobile phone blast) झाल्याच्या घटना आता वाढताना दिसत आहेत. सांगलीतून (Sangli) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाच्या पॅन्टच्या खिशात चक्क स्मार्टफोनचा स्फोट (Smartphone explodes in pant) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत संबंधित तरुणाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून स्मार्टफोन पूर्णपणे उद्धव्स्त झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Oneplus mobile explodes in youths pocket in Sangli)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका तरुणाकडील OnePlus कंपनीच्या मोबाइलचा खिशात स्फोट झाला आहे. यामुळे त्या तरुणाच्या मांडीला गंभीर इजा देखील झाली आहे. आटपाडी तालुक्यातील प्रकाशवाडीमधील हा तरुण असून त्याने या प्रकारानंतर मोबाइल कंपनीच्या विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली आहे.

वाचा : Online class सुरू असतानाच Smartphone चा स्फोट आणि विद्यार्थ्याचा जबडा...

या तरुणाने मोलमजुरी करून हा मोबाईल खरेदी केला होता. या तरूणाने काही महिन्यांपूर्वीच मोबाइल सांगलीतील एका शॉपीमधून घेतला होता. आज त्या तरुणाकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नव्हते मित्रांनी मदत केली म्हणून तो उपचार करू शकला.

काही दिवसांपूर्वी एका ट्विटर युजरने केली होती तक्रार

मागील 2021 वर्षात OnePlus Nord 2 स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. आता 2022 मध्ये पुन्हा एकदा OnePlus फोनचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. यावेळी OnePlus Nord 2 नाही, तर OnePlus Nord CE चा स्फोट झाला आहे. एका युजरने ट्विटरवर याबाबत माहिती देत फोनचे फोटोही शेअर केले आहेत.

ट्विटर युजर दुष्यंत गिरी गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा सहा महिने जुना वनप्लस स्मार्टफोन ब्लास्ट झाला. त्यांनी या फोनचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये वनप्लस फोनचा मागचा भाग पूर्णपणे डॅमेज झाल्याचं दिसतंय. बॅक पॅनल इतक्या मोठ्या प्रमाणात खराब झालं आहे की फोनची बॅटरी देखील दिसते आहे.

वाचा : मोबाइल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट

4 जानेवारी रोजी ट्विटर युजरने वनप्लस फोनच्या ब्लास्टबाबत ट्विटरवर माहिती दिली. त्याशिवाय लिंक्डइनवरही या युजरने संपूर्ण घटनेबाबत OnePlus सीईओंना लिहिलं आहे. त्याने सांगितलं, की मला पॉकेटमध्ये काहीतरी हीट जाणवली म्हणून मी फोन पॉकेटमधून बाहेर काढला. फोन पॉकेटमधून बाहेर काढल्याच्या 2 ते 5 सेकंदात फोनचा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमुळे माझा मृत्यूही होऊ शकत होता.

First published:

Tags: Sangli, Smartphone