मध्य प्रदेश, 17 डिसेंबर : मोबाइल फोनचा स्फोट (Smartphone Blast) झाल्याच्या कित्येक घटना आपण आतापर्यंत समोर आल्या आहेत. कधी मोबाइल रिपेअरिंगच्या दुकानात, तर कधी घरात, किंवाकोणाच्या खिशातच मोबाइलचा स्फोट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका शाळेच्या ऑनलाइन क्लासवेळी मोबाइलचा स्फोट झाल्याने 15 वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात ही घटना समोर आली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदकुइया गावात ही घटना घडली. आठव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी रामप्रकाश शाळेच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये होता, त्याचवेळी अचानक मोबाइलचा स्फोट झाला.
या भयंकर स्फोटामुळे रामप्रकाशच्या जबड्याला मोठी इजा झाली आहे. ही घटना घडली त्यावेळी तो एकटाच घरात होता. त्याचे आई-वडिल तसंच कुटुंबातील इतर सदस्य कामासाठी बाहेर गेल्याने हा स्फोट झाला त्यावेळी तो एकटाच घरात होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता, की रामप्रकाशच्या आजूबाजूचे सर्व जण त्याच्या घरी जमा झाले. इतका मोठा आवाज कसला आला, हे पाहण्यासाठी सर्वजण त्याच्या घरी जमले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी रामप्रकाशला सतना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढे चांगल्या उपचारांसाठी त्याला जबलपूर येथे पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, याआधीही स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घटना आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Smartphone