मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Shocking Video : मोबाइल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट

Shocking Video : मोबाइल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट

जर मालकाच्या खिशात या मोबाइलचा स्फोट झाला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

जर मालकाच्या खिशात या मोबाइलचा स्फोट झाला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

जर मालकाच्या खिशात या मोबाइलचा स्फोट झाला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

मुंबई, 19 नोव्हेंबर : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video on Social Media) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दुकानदार मोबाइल रिपेअर करीत होता, त्यावेळी अचानक मोबाइलच्या बॅटरीचा (Mobile Battery Blast) स्फोट झाला. (mobile phone battery exploded) स्फोट झाल्यानंतर मोबाइलला आग लागली. ही घटना व्हिएतनाम (Vietnam) मधील थाई युगेनमधील एका मोबाइल दुरुस्ती केल्या जाणाऱ्या दुकानातील आहे. कर्मचारी फोन दुरुस्त करीत होता, तेव्हा मोठा स्फोट झाला. पुढच्याच क्षणी फोनमधील बॅटरीला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे तरुणदेखील घाबरला. त्याने तातडीने फोन बाहेर फेकून दिला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फोनला आग लागताच तरुणाने फोन बाहेर फेकून दिला. स्फोट झाल्यानंतर दुकानातील अन्य कर्मचारीदेखील धावताना दिसत आहे.

हे ही वाचा-हसावं की रडावं..? स्टंट करताना तरुणाची झालेली अवस्था पाहून पडेल प्रश्न, VIDEO

ही घटना 5 नोव्हेंबर 2021 रोजी घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल हॉग (Viral Hog) या यूट्यूब चॅनलने शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तरुण फोन दुरुस्त करीत होता, तेव्हा फोनची बॅटरी फुटली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

" isDesktop="true" id="632611" >

लोकांनाही व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, जर मालकाच्या खिशात फोन फुटला असता तर...या घटनेत दुरुस्त करणाऱ्या तरुणाला काही दुखापत झाली नाही, याबद्दल नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Mobile