Home /News /maharashtra /

पेट्रोल दरवाढीवरून रोहित पवारांनी फडणवीसांना ठरवलं खोटं, पुराव्यासह केला खुलासा

पेट्रोल दरवाढीवरून रोहित पवारांनी फडणवीसांना ठरवलं खोटं, पुराव्यासह केला खुलासा

'खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान'

मुंबई, 10 जुलै : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol diesel price hike) दरांनी शतक पार केले आहे. पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसली आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (mva goverment) राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुराव्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) इंधनाच्या करावरून खोट बोलत असल्याचा पर्दाफाश केला आहे. रोहित पवार यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून भाजपची चांगलीच पोलखोल केली आहे. पेट्रोल- डिझेल हे आपल्याकडे ३० रुपयांमध्ये मिळतं. त्यावर काही कर आणि वाहतूक खर्च मिळून त्यावर केंद्र सरकार 32 रुपये कर लादते आणि त्यावर राज्य सरकारला 12 रुपये मिळता. त्यावर राज्याकडून 30 रुपये खर्च आकारला जातो. एकूण 100 रुपये पेट्रोलचे दर असेल तर 42 रुपये हे राज्य सरकारचे आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. यावर रोहित पवार म्हणाले की, 'खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही' असा सणसणीत टोला रोहित पवारांनी लगावला.

‘सलमान खानला या प्रकरणातून दूर ठेवा’; Being Human कंपनीची पोलिसांना विनंती

'केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोलवरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगतात' असा खुलासाच रोहित पवारांनी केला. आंद्रे रसेलची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, पहिल्यांदाच केली 'ही' कामगिरी 'विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही' असा सणसणीत टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Devendra Fadnavis, Petro price hike, Rohit pawar

पुढील बातम्या