• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • ‘सलमान खानला या प्रकरणातून दूर ठेवा’; Being Human कंपनीची पोलिसांना विनंती

‘सलमान खानला या प्रकरणातून दूर ठेवा’; Being Human कंपनीची पोलिसांना विनंती

सलमान खानवर आर्थिक फसवणुकीचा आरोप; पोलिसांनी बजावलं समन्स

  • Share this:
    मुंबई 10 जुलै: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आपल्या वादग्रस्त प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असतो. यामुळे त्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. आता त्याच्यावर एका व्यवसायिकानं आर्थिक फसवणूकीचे आरोप केले आहेत. (Financial fraud case) या प्रकरणी त्याला चंदिगढ पोलिसांनी चौकशीसाठी समन्स देखील पाठवलं होतं. परंतु या प्रकरणाशी सलमानचा काहीही संबंध नाही असा दावा त्याच्या बिंग ह्युमन कंपनीतील (Being Human) अधिकाऱ्यांनी केला आहे. आमच्या कंपनीनं कुठल्याही प्रकराची फसवणूक केलेली नाही. शिवाय या प्रकरणाशी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. कृपया त्याला या प्रकरणापासून दूर ठेवा असं अधिकृत स्टेटमेंट बिंग ह्युमन कंपनीकडून जारी करण्यात आलं आहे. सध्या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. प्रकरण काय आहे? मिळालेल्या माहितीनुसार या व्यवसायिकाचं नाव अरुण गुप्ता असं आहे. त्यानं बिंग ह्युमनची एक ब्रांच चंदिगढमध्ये सुरु केली होती. या व्यवहारात त्याच्याकडून 3 कोटी रुपये घेतले गेले. परंतु काही महिने उलटून गेले तरी त्याला सामान काही मिळालं नाही. या प्रकरणी त्यानं कंपनीकडे तक्रार केली. परंतु त्यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अखेर त्याने सलमान, त्याची बहिण अर्पिता आणि बिंग ह्युमन कंपनीविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून व्यवसायिकानं कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे. ही ‘Choti Kangana’ आहे तरी कोण? Photo पाहून बॉलिवूडची क्वीनही चक्रावली सोना रेस्तरॉमध्ये प्रियांकाचा Bold अवतार; देसी गर्लला पाहून ग्राहकही अवाक अरुण गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलमानसोबत काही फोटो देखील काढले होते. ते सलमानचे खूप मोठे फॅन आहेत. अन् सलमानवर विश्वास ठेवूनच त्यांनी गुंतवणूक केली होती. परंतु त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला. शोरुमच्या ओपनिंगसाठी स्वत: सलमाननं येण्याचं वचन त्यांना दिलं होतं परंतु शेवटी त्यांनी आपला मेहुणा आयुष शर्माला पाठवलं असा दावा त्यांनी केला आहे. या व्यवहारात त्यांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: