मुंबई, 10 जुलै : जगभरातील टी20 लीगमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलची (Andre Russell) 10 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रसेलनं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात (WI vs AUS) रसेलनं पहिले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तान विरुद्ध 2011 साली पदार्पण करणाऱ्या रसेलनं 55 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावले.
रसेलनं मिचेल स्टार्कच्या बॉलिंगव सिक्स लगावत हे अर्धशतक पूर्ण केले. रसेलनं ही कामगिरी फक्त 26 बॉलमध्ये पूर्ण केली. त्यानंतर तो फार टिकू शकला नाही. जोश हेजलवुडनं पुढच्याच ओव्हरमध्ये रसेलला 51 रनवर आऊट केले. रसेलनं 28 बॉलमध्ये ही खेळी केली. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजला 145 पर्यंत मजल मारता आली. रसेलनं या खेळीत 3 चौकार आणि 5 सिक्स लगावले.
A first T20I half-century for Andre Russell 👏
It comes off just 26 deliveries and he has revived the hosts’ hopes in this match. 📸: @windiescricket https://t.co/ozP8eO2Ktv | #WIvAUS pic.twitter.com/VkcZBASdSQ — ICC (@ICC) July 10, 2021
ऑस्ट्रेलियानं विजयाच्या दिशेनं भक्कम वाटचाल सुरु केली होती. ऑस्ट्रेलियाला 10 ओव्हरनंतर विजयासाठी 41 रन हवे होते आणि त्यांच्या 5 विकेट्स शिल्लक होत्या. त्यानंतर मकॉयच्या (Obed McCoy) भेदक बॉलिंगमुळे मॅच फिरली. मकॉयनं 26रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम 16 ओव्हरमध्येच 127 रनवर ऑल आऊट झाली.
IPL 2022 : '...तर मी पुढील IPL खेळणार नाही', सुरेश रैनाची मोठी घोषणा
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शनं सर्वाधिक 51 रन काढले. मकॉयला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, West indies