Home /News /maharashtra /

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, धनंजय मुंडेंनी भाजप आमदारावर केला पलटवार

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, धनंजय मुंडेंनी भाजप आमदारावर केला पलटवार

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला 'कोरोना' आहे, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

    मुंबई, 24 जून: भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला 'कोरोना' आहे, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. आमदार पडळकरांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी टीट्व केलं आहे. हेही वाचा...राष्ट्रवादीचे नेते भाजप आमदार पडळकरांवर भडकले, फडणवीसांना विचारला थेट जाब 'राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की @PawarSpeaks साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!', अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे. राज्यभरात पडसाद... शरद पवार हे राज्याला लागलेले कोरोना आहे, अशी विखारी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आता याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढेचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असंही अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा...राज ठाकरेंचा दरारा कायम! T-Series कंपनीकडून पाकिस्तानी गायकाचं गाणं Delete काय म्हणाले होते पडळकर? 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीकाही पडळकरांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला.
    First published:

    Tags: Dhananjay munde, Sharad pawar

    पुढील बातम्या