Home /News /pune /

राष्ट्रवादीचे नेते भाजप आमदार पडळकरांवर भडकले, फडणवीसांना विचारला थेट जाब

राष्ट्रवादीचे नेते भाजप आमदार पडळकरांवर भडकले, फडणवीसांना विचारला थेट जाब

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुरुवारी पुण्यात आंदोलन करणार आहेत.

    पुणे, 24 जून :भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली. पडळकरांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. शरद पवार हे राज्याला लागलेले कोरोना आहे अशी विखारी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांच्या टीकेचा समाचार घेत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे  यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढेचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला. गोपीचंद पडळकर यांनी  शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला. सावकार आणि पत्नीची गुंडगिरी, शेतकऱ्याच्या पत्नीसोबत अत्यंत संतापजनक वर्तन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10  वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असंही अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं. काय म्हणाले होते पडळकर? 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीकाही पडळकरांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला. संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या