मुंबई, 24 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचा दरारा कामय असल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांची मागणी भारतीय म्युझिक कंपनी T-Series नं मान्य केली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेलं गाणं 'किंना सोना' हे T-Series कंपनीच्या यू-ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यात येणार नाही, असंही T-Series कंपनीनं राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा...
...तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल
पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेलं 'किंना सोना' हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याकडून नजर चुकीनं T-Series च्या यू-ट्यूब चॅनेलवर रिलिज झालं. त्याच्या चुकीमुळे टी सीरिज कंपनीनं माफी देखील मागितली आहे. यापुढे कोणत्या पाकिस्तानी गायकाचं गाणं टी सीरिजच्या यू ट्यूब चॅनलवर रिलिज किंवा प्रमोट करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी देशातील सर्व म्युझिक कंपन्यांना पत्र लिहिलं होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांसोबत काम करायचं नाही, असा इशारा मनसेनं या पत्रातून दिला होता.
हेही वाचा...
एक विवाह ऐसा भी! विवाहाच्या दिवशी नवदाम्पत्यानं कोव्हिड सेंटरला भेट दिले 50 बेड
दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उठली होती. त्याचा परिणाम पाकिस्तानी कलाकारांनाही भोगावा लागला. पाकिस्तानी गायक आतिफ असलम याच्यापासून सुरूवात झाली. T-Series नं आतिफ असलमचं गाणे 'बारिशें'ला सगळ्यात आधी यू-ट्यूबवर Unlist केलं होतं. हे गाणं यू-ट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.