मुंबई, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळात सोमवारचा दिवस अभूतपूर्व ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार असं वाटत असतानाच शिवसेना नेते राज्यपालांना भेटायला गेले. पण राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र आलंच नाही. राज्यपालांनी शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं. सत्तास्थापनेची इच्छा आणि शक्यता असेल तर 24 तासात कळवण्याची मुदतही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला दिली. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि राज्याच्या राजकाराणाला अर्ध्या तासात ट्विस्ट मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळेच पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळालं नाही. राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसने कळवलं. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात दोनच शक्यता राहिल्या आहेत. वाचा - काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी, राज्यपालांचा वेळ वाढवून द्यायला नकार 1. महाशिवआघाडी : तिन्ही पक्षांचं एकत्र सरकार काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. पण त्यासाठीही शिवसेनेचं साहाय्य लागेल. हे तीन पक्ष एकत्र आले तरच सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ उभारू शकतात. मग मुख्यमंत्रिपद हाच तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटीचा विषय होऊ शकतो. वाचा - अर्ध्या तासांत बदललं सत्तास्थापनेचं चित्र, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल? 2. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवणार बरोबर 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारमधून फुटून स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस आघाडी सरकारमधून 40 आमदारांसह बाहेर पडून शरद पवार पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्याची आठवण देणारी परिस्थिती निर्माण व्हायला पुरेसा वाव आहे. त्यामुळे आमदारांची फोडाफोडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळ जमवू शकेल. त्या वेळी त्यांनी थेट जनता पक्षाशी (त्या निवडणुकीत जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही तो पक्ष सत्तेत सगभागी नव्हता.) जवळीक साधली. VIDEO : सेनेला पाठिंबा का दिला नाही? काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण जुलै 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग शरद पवारांनी केला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय सरकार सत्तेत आणलं. समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. आत्ताच भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची बातमी आली आहे. त्यामुळे असं आमदार फोडाफोडीचं राजकारण झालं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणंही सहज शक्य होईल. 3. राष्ट्रपती राजवट राष्ट्रवादी पुरेसं संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेस असमर्थता व्यक्त करेल आणि मग राष्ट्रपती राजवटीला पर्याय राहणार नाही. वाचा - भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांना फोन, राजकारणात मोठी खळबळ ——————————– हे वाचा #MaharashtraPolitics : महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार? सत्तानाट्यात सर्वात मोठा ट्विस्ट, काँग्रेसचं पत्र आलं पण पाठिंबा नाही! VIDEO : सत्ता स्थापनेचा दावा केला का? आदित्य ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







